हलकर्णीचे माजी सरपंच जाॅन लोबो यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2021

हलकर्णीचे माजी सरपंच जाॅन लोबो यांचे निधन

जाॅन लोबो

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील माजी सरपंच जाॅन लोबो यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. मनमिळाऊ, हसतमुख असणारे जाॅन लोबो यांचे अनेक भाषेवर प्रभुत्व होते. 

      इटली (रोम) येथील आकाशवाणी केंद्रात त्यांनी सेवा बजावली होती. १९९५ ते २००० साली सरपंचपद व २००५ ते २०१० साली गावचे उपसरपंच भूषविले. नळपाणी योजना, जयभवानी सेवा संस्थांचे संस्थापक संचालक, विवेक इंग्लिश मेडियम स्कूल, स्कूल कमिटी संचालक, संत अंथोनी पतसंस्था, तालुका स्तरीय न्यायालयीन विधी सेवा समिती आदी ठिकाणी त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे.No comments:

Post a Comment