वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हिंडाल्को मार्फत चंदगड आरोग्य विभागाला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2021

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हिंडाल्को मार्फत चंदगड आरोग्य विभागाला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

चंदगड येथे आरोग्य विभागाला हिंडाल्कोमार्फत विश्वास शिंदे पांच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आम.राजेश पाटील यांच्याकडे भेट देतांना, बाजूला तहसिलदार रणवरे,डाॅ खोत,डाॅ साने,गटविकास अधिकारी बोडरे आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यात  कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या बाधितांना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी आमदार पाटील यांनी हिंडाल्को कंपनीकडू मदत मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. हिंडाल्को कंपनीमार्फत चंदगड तालुका आरोग्य विभागाला अत्याधुनिक अशी पाच  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. हिंडाल्कोचे मनुष्यबळ विकास संचालक विश्वास शिंदे यांच्या हस्ते आमदार राजेश पाटील, तहसिलदार विनोद रणवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. के. खोत, डाॅ. एस. एस. साने, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वीकारले.

        चंदगड तालुक्यातील आरोग्य विभागाला हिंडाल्को कंपनीची सर्वोतोपरी राहील अशी ग्वाही विश्वास शिंदे यांनी दिली. तर कोरोनावर मात करण्यासाठी सांघिक पध्दतीने कार्य करणे गरजेचे आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कंपनी व व्यक्तींनी आरोग्य विभागाला मदत करावी असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले. या वेळी संगयोचे अध्यक्ष प्रवीण वांटगी, अलीसो मुल्ला, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परिट, हिडाल्कोचे मॅनेजर भरत जिनगे, वैद्यकीय अधिकारी ईश्वर मगदूम, विनायक गडकरी,रमेश चौगुले उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment