ओलम कारखान्यामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल कोविड सेंटरसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देताना सोबत आमदार राजेश पाटील. |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम ॲग्रो इंडिया प्रा. लि. या कारखान्यामार्फत चंदगड तालुक्याच्या कोरोना बाधित रूग्णांसाठी 10 लिटर ची तिन ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आली.
ओलम साखर कारखाना आपत्ती काळात नेहमिच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतो . यामुळेच कोविड सारख्या या कठीण परिस्थितीत कोविड सेंटरसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देवून सामाजिक दातृत्व स्विकारले. यावेळी चंदगड चे आमदार राजेश पाटील , चंदगड तहसिलदार विनोद रणावरे आरोग्य अधिकारी श्री खोत , ओलम कारखान्यामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल, मुख्य शेति अधिकारी सुधिर पाटील, एच आर. अजिज झुंनझानी, अनिल पाटील, नामदेव पाटील, रमेश पाटील, गणपत पाटील, दयानंद देवण आदि अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment