प्रत्यक्ष शेतावर 'यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण', तालुका कृषी कार्यालय व महिंद्रा कंपनीचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2021

प्रत्यक्ष शेतावर 'यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण', तालुका कृषी कार्यालय व महिंद्रा कंपनीचा उपक्रम


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      तालुका कृषी अधिकारी कार्यालय चंदगड व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 'यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक व प्रशिक्षण'  कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी शनिवार दिनांक २६ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कुरणी (ता. चंदगड) येथील चंद्रकांत पाटील यांच्या शेतावर शेतकऱ्यांना हे प्रात्यक्षिक पाहता येणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी दिली. 

   महाराष्ट्र शासन कृषी विभाग (ता. चंदगड) यांच्या वतीने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला चंदगड तालुका कृषी अधिकारी,  चंदगड, कोवाड व तुर्केवाडीचे मंडळ कृषी अधिकारी,  तसेच स्टेट मॅनेजर, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी सकाळी तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कुरणी येथील चंद्रकांत पाटील यांच्या शेतावर वेळेवर उपस्थित राहावे. या कार्यक्रमाला येताना कोरोनाचा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 
No comments:

Post a Comment