हडलगे येथील अमृत लोहार यांची पर्यवेक्षकपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2021

हडलगे येथील अमृत लोहार यांची पर्यवेक्षकपदी निवड


अमृत लोहार

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

      हडलगे (ता. गडहिंग्लज)  चे सुपुत्र अमृत धोंडोपंत लोहार यांची नेसरी येथील एस. एस. हायस्कुलच्या पर्यवेक्षक पदी निवड झाली आहे. या आधी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी म. फुले हायस्कुल बटकनंगले येथे ६ महिने काम पाहिले होते. त्यांची आतापर्येंत २८ वर्ष इतकी सेवा झाली असून ते उत्कृष्ठ असे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. त्यांच्या निवडीच्या पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी त्यांना ड. हेमंत कोलेकर (अध्यक्ष शिक्षण समिती क नेसरी) सर्व स्टाफचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment