लेखक - ऋग्वेदी सोमनाथ पाटील, (कालकुंद्री - इयत्ता- सहावी)
पहाट झाली सूर्य उगवला
सुरू झाली पक्ष्यांची किलबिल,
सोनेरी किरणांचा प्रकाश झाला
सुरु झाली साऱ्यांची झिलमिल.
उगवण्याने रविराजाच्या
मिटुन जातो सारा अंधःकार,
खुलून उठती बागा फुलांच्या
पाहुण्या नव्या गंधाचा हुंकार.
शेती, डोंगर, राने, वेलींनी
धरती सारी नटून गेली,
उन्हात भिजलेल्या शेतकऱ्यांनी
काळी माती हिरवी केली.
वेळ झाली मावळण्याची
लगबग सार्यांची सुरू झाली,
मिटून गेली सूर्याची किरणे
दिवस संपण्याची वेळ झाली.
![]() |
ऋग्वेदी सोमनाथ पाटील |
No comments:
Post a Comment