कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत 'आर्त हाक' कविता प्रथम, तर `जीवन` कवितेला द्वीतीय क्रमांक - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2021

कालकुंद्री येथे कविता लेखन स्पर्धेत 'आर्त हाक' कविता प्रथम, तर `जीवन` कवितेला द्वीतीय क्रमांक

चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना कवी सागर पाटील.

कालकुंद्री : सी. एल. न्यूज वृत्तसेवा

        कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गाव मर्यादित कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत गावातील २४ कवींनी आपल्या निवडक कविता सादर केल्या. गाव मर्यादित असूनही स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेत बाळकृष्ण दत्तू तेऊरवाडकर, आशिष मारुती पाटील, विनायक लक्ष्मण पाटील- सांबरेकर, प्रज्ञा कदम, शुभांगी प्रमोद पाटील, ऋग्वेदी सोमनाथ पाटील, सुषमा नारायण भातकांडे, स्नेहल अरिवंद कोकीतकर, योगिता पाटील, शिल्पा कल्लाप्पा पाटील, मोहन गुरुनाथ कांबळे, गजानन विठोबा पाटील, सागर बाजीराव पाटील, आर आर पाटील, प्रशांत कोकितकर, विनोद जोतिबा पाटील, उदय नारायण सुतार, संदीप बाजीराव पाटील, पारस अरविंद कोकितकर, विनायक तुकाराम पाटील, रामराव हरिभाऊ पाटील, अजित मारुती खवणेवाडकर, सुचिता सुखदेव भातकांडे, सुशांत राजाराम पाटील आदि नवोदित कवींनी सहभाग घेतला.

           या दर्जेदार कवितांचे परीक्षण ज्येष्ठ कवी चंद्रकांत पोतदार यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या कविता व कवी पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक- 'आर्त हाक'-  कु. सुचिता भातकांडे, द्वितीय क्रमांक- 'जीवन'- कु. शिल्पा पाटील, तृतीय क्रमांक- 'कोरोनासुर'- सुशांत पाटील, चतुर्थ क्रमांक- 'होडी'- सागर पाटील, पाचवा क्रमांक- 'माझी बाय'- विनायक पाटील, सहावा क्रमांक- 'सूर्य'- ऋग्वेदी पाटील.

          विजेत्या स्पर्धकांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात एम. बी. पाटील, श्रीकांत व्ही पाटील, क. पा. पाटील, शंकर मुर्डेकर, झेवियर क्रूज, सुखदेव भातकांडे, भरमू पाटील, लोकळू पाटील आदींसह वाचनालय पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. व्ही. आर. पाटील यांनी केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.

टीप - 'आर्त हाक' 'जीवन' 'कोरोनासुर' 'होडी' 'माझी बाय' 'सूर्य' या ६ ही कविता सी. एल. न्युजच्या वाचकांसाठी सोमवार ते शनिवार रोज एक या प्रमाणे प्रसिध्द केल्या जातील. याची वाचकांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment