पाटणे फाटा येथे भरदिवसा शिक्षकाचे घर फोडून ५१हजाराचा मुद्देमाल लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2021

पाटणे फाटा येथे भरदिवसा शिक्षकाचे घर फोडून ५१हजाराचा मुद्देमाल लंपास

 


चंदगड / प्रतिनिधी

        पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे मंगळवारी भरदिवसा शिक्षकाचे घर अज्ञात चोरट्याने फोडून सोन्याच्या नेकलेसह ५१ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. ३० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड या दरम्यान ही घटना घडली.

  पाटणे फाटा येथे तिलारीनगर रस्यावर असलेल्या गोविंद सुभाना गावडे या शिक्षकाच्या घरात काल अज्ञात चोरट्याने समोरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील तिजोरी कपाट लोखंडी  सळई ने उचकटून कपाटातील अडीच तोळे सोन्याचा नेकलेस व ११हजार रुपये रोख असा  ५१हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.याबाबतची फिर्याद गोविंद गावडे यांनी चंदगड पोलीसात दिली आहे. अधिक तपास पो.नाईक मकानदार करत आहेत.No comments:

Post a Comment