बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाडने गुणवत्ता सिद्ध केली! - केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2021

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाडने गुणवत्ता सिद्ध केली! - केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील

पुरस्काराबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाड स्टाफ चे अभिनंदन करताना केंद्रातील मुख्याध्यापक.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

          बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाड (ता. चंदगड) मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकाभिमुख कामामुळे बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. बँक आँफ महाराष्ट्रच्या ८७  व्या वर्धापनदिनानिमीत्त राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या कॅम्पेनिंग स्पर्धेत ग्रामीण विभागात ६११ शाखांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. यानिमित्ताने शाखेची गुणवत्ता व दर्जा सिद्ध झाला आहे. असे प्रतिपादन कोवाड शाळा समूह केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांनी केले. पुरस्काराबद्दल केंद्रातील सर्व शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते. 

         मलतवाडी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर यांच्या हस्ते शाखाधिकारी कुलदीप चौगुले, असिस्टंट मॅनेजर किरण सौदागर, संदीप पाटील, राजेंद्र देसाई, दिगंबर पाटील, शिपाई परशराम कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर मुतकेकर म्हणाले, शाखाधिकारी कुलदीप चौगुले यांनी आपल्या कार्यातून शाखेला एक वेगळी दिशा दिली आहे. त्यांच्या काळात मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे शाखेच्या लौकिकात भर पडली असून ही बाब सर्व ग्राहकांना अभिमानास्पद आहे. यावेळी चिंचणे मुख्याध्यापक प्रकाश नांदुडकर, तेऊरवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतान लोबो, कालकुंद्री शाळेचे जे आर पाटील व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण सौदागर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment