नांदवडे शाळेचे नवोदय, प्रज्ञाशोधसह विविध स्पर्धेत धवल यश, यशाची परंपरा कायम - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2021

नांदवडे शाळेचे नवोदय, प्रज्ञाशोधसह विविध स्पर्धेत धवल यश, यशाची परंपरा कायम

कु. निकिता नामदेव मोरे                   कु शुभम नारायण पवार
                                               नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थ्यी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       गेल्या दहा वर्षात विविध परीक्षेतील सातत्यपूर्ण यशामुळे आपल्या गुणवतेचा ठसा उमटवणाऱ्या केंद्रीय प्राथमिक शाळा नांदवडे (ता. चंदगड) शाळेने ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व कोल्हापूर जिल्हा परिषद आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली.

कु. सानवी रामचंद्र पाटील
इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परिक्षेत चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक

          शाळेचे विद्यार्थी कु शुभम नारायण पवार व कु निकिता नामदेव मोरे या दोन विद्यार्थ्यांची कागल येथे जवाहर नवोदय विद्यालय येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. तसेच सप्टेंबर २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी कु सानवी रामचंद्र पाटील हिने २०० पैकी १७२ गुण मिळवुन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. 

कु. साक्षी तुकाराम शिंदे
इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परिक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत निवड

       तर इयत्ता ७ वी ची विद्यार्थिनी कु साक्षी तुकाराम शिंदे हिने तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. यापूर्वीही शाळेने शिष्यवृत्ती परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा तसेच मंथन व गुरुकुल सारख्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक आर. एन. पाटील, चौथीचे वर्गशिक्षक संदीप म्हाडगुत, सातवीचे वर्गशिक्षक बाबुराव गावडे तसेच मुख्याध्यापक चंद्रशेखर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे व गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांचे प्रोत्साहन लाभले. नांदवडे गावचे सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच प्रा. एन. एस. पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परशराम पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे विशेष कौतुक केले.

No comments:

Post a Comment