सोनारवाडी येथे बेकायदा गावठी दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2021

सोनारवाडी येथे बेकायदा गावठी दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        सोनारवाडी (ता. चंदगड) येथे ४६५ रुपये किमतीची गावठी दारू अवैध्यरित्या जवळ बाळगल्याप्रकरणी येथीलच गिता महादेव पाटील (वय ३९ रा. सोनारवाडी) व  दारू पुरवठा करणारा पुरवठादार लक्ष्मण नाईक ( रा. डुक्करवाडी) या दोघांवर चंदगड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      चंदगड पोलिसातून मिळालेली आधिक माहिती अशी, संशयित आरोपी गीता पाटील यांच्या राहत्या घराच्या शेजारी असणाऱ्या जनावारांच्या गोठ्या समोर  स्वतःच्या फायद्याकरीता  विनापरवाना बेकायदा प्लास्टीक कॅनमध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू अंदाजे ३ लिटर  व एक स्टीलचा ग्लास असा ४६५ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. यातील संशयित आरोपी गीता हिचा गावठी दारू विक्रिचा गुत्ता असून तीला दुसरा संशयित आरोपी लक्ष्मण नाईक दारू पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाल्याने चंदगड पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. याची फिर्याद पोलिस नाईक भूषण महापुरे यांनी दिली असून याचा अधिक तपास पो. हे. कॉ. कोगेकर करीत आहेत.No comments:

Post a Comment