शिनोळी येथे कल्याण मटका घेताना छापा, एकावर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2021

शिनोळी येथे कल्याण मटका घेताना छापा, एकावर गुन्हा दाखल

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       शिनोळी (ता. चंदगड) येथे कमानीजवळ कर्नाटक -महाराष्ट्र सिमेनजीक दि. २८ रोजी दुपारी २.४५ वाजता उघडयावर कल्याण मटक्याच्या चिठ्या लोकांकडून घेत असतानां पोलीसांनी छापा टाकून विठ्ठल यल्लाप्पा भोसले (रा. देवरवाडी, ता. चंदगड) याला ताब्यात घेतले. यावेळी १८६२ रुपये रोख व पांढऱ्या कागदावर नंबर लिहीलेली चिठ्ठी जप्त केल्या. स्वतःच्या फायद्याकरीता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका चालवल्याप्रकरणी  आरोपी विठ्ठल भोसले यांच्यावर ३०१ / २०२१ महाराष्ट्र जुगार बंदी कायदा १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पो. कॉ. संदिप कांबळे यानी चंदगड पोलिसात दिली असून पोसई अंकुश कारंडे अधिक तपास करीत आहे.
No comments:

Post a Comment