तुडये येथे सोमवारी हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2021

तुडये येथे सोमवारी हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजनतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      एकता, कला, क्रीडा मंडळ तुडये (ता. चंदगड) यांच्या वतीने  एकता प्रिमिअर लिग २०२१ (EPL) हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सोमवार दि. १ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

        श्री रामलिंग ज्यूनिअर कॉलेजच्या क्रिडांगणावर दुपारी तीन वाजता चालू होण्याऱ्या या स्पर्धासाठी तब्बल २१००१ रूपये व  १५००१ रूपये व चषक तसेच उत्कृष्ठ  फलंदाज व गोलंदाजासाठीही चषक बक्षिस देण्यात येणार आहे. यावेळी मोहिते पेट्रोलियमचे परशराम मोहिते, सरपंच विलास सुतार, सौ. सुनिता हुलजी, जगन्नाथ हुलजी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन एकता कला क्रिडा मंडळाकडून करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment