मोरेवाडी येथे रविवारी स्मारक वास्तूशांती , मूर्ती अभिषेक व रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2021

मोरेवाडी येथे रविवारी स्मारक वास्तूशांती , मूर्ती अभिषेक व रक्तदान शिबीराचे आयोजन


तेऊरवाडी / एस .के. पाटील
मोरेवाडी ( ता. चंदगड ) येथे ह भ .प. वै . कृष्णा कुराडे यांच्या प्रथम पुण्यतिथी सोहळ्यानिमित्य स्मारक वास्तूशांती , मुर्ती अभिषेक व सत्यनारायण महापुजेचे आयोजन  रविवार दि .३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे . यानिमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन लक्ष्मण कुराडे , सौ . चंद्रभागा कुराडे व स्मारक समिती मोरेवाडी यानी केले आहे . 
या निमित्य रविवारी सकाळी ८ वाजता विठ्ठल रखुमाई मंदिरात सत्यनाराण महापूजा होणार आहे . तर त्यानंतर लगेच मुर्तींची मिरवणूक काढण्यात येणार आहे . याच वेळी मराठी विद्यामंदिरच्या प्रांगणात रक्तदानाचा कार्यक्रम अण्णासाहेब गळतगे ब्लड बँक गडहिंग्लज यांचेकडून होणार आहे .१० नंतर शिवकुमार स्वामी यांच्या मंत्रोच्चारात होम , मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक होणार .नंतर ध्वजपूजन , तुळस पुजन , गाथा पूजन व दिपप्रज्वलन होऊन दुपारी १ नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे . दुपारी सांप्रदायिक दिंडयाचे भजन तर सायंकाळी हरिपाठ व रात्री अरुण पोवार (तळाशी, राधानगरी) यांचे किर्तन होणार आहे. याबरोबरच दुपारी अनिल कुराडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमही होणार आहे. या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन स्मारक समितीने केले आहे.


No comments:

Post a Comment