दिपावलीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यानी केली तेजोमय दिवाळी, मराठी अध्यापक संघाची आकाश कंदिल कार्यशाळा यशस्वी - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2021

दिपावलीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यानी केली तेजोमय दिवाळी, मराठी अध्यापक संघाची आकाश कंदिल कार्यशाळा यशस्वी

ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवर
तेऊरवाडी -सी. एल. वृत्तसेवा
माझी दिवाळी, माझा आकाश कंदिल ,या उपक्रमांतर्गत चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ , जिल्हा कोल्हापूर व्दारा आयोजित दीपावलीच्या तेजोमय सोहळ्यासाठी स्वहस्त कौशल्यातून आकाशकंदील निर्मिती याऑनलाईन कार्यशाळेच्या मार्गदर्शक सौ. पुष्पा  सुतार दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड यांनी कार्डशीट पेपर, जिलेटीन पेपर, फेव्हीकॉल ,कात्री कंपास, कटर यापासून अतिशय सुंदर व आकर्षक आकाश कदिल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. 
स्वागत संजय साबळे यांनी केले. प्रास्ताविक अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवणगेकर यांनी केले. सौ. शकुंतला बोकडे, सुभाष बेळगावकर यांनी ही टाकाऊ वस्तुपासून आकर्षक आकाश कंदिल बनवून दाखवले. या ऑनलाईन कार्यक्रमाला १५O विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाला सौ. अश्विनी देवण, सौ. संगीता पाटील, सौ. सुजाता कोरवी ,सौ. कांबळे ,बी.एन.पाटील, एस.पी. पाटील, व्ही.एल. सुतार, एच.आर. पाऊसकर, फिरोज मुल्ला, राजेंद्र शिवणगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  रविंद्र पाटील यांनी तर आभार साै. दिपा बल्लाळ यांनी केले.No comments:

Post a Comment