मालकाने माराहाण केल्याच्या नैराश्यातून कानूर येथील हॉटेल कामगाराची पुण्यात आत्महत्या, चंदगड पोलिसात मालकाविरोधात गून्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2021

मालकाने माराहाण केल्याच्या नैराश्यातून कानूर येथील हॉटेल कामगाराची पुण्यात आत्महत्या, चंदगड पोलिसात मालकाविरोधात गून्हा दाखल

प्रभाकर जयराम कांबळे

चंदगड / प्रतिनिधी

         महीनाभर कामावर हजर न झाल्याने आपले नुकसान झाल्याच्या राग मनात धरून हॉटेल मालकाने कानूर (ता. चंदगड) येथील प्रभाकर जयराम कांबळे (वय वर्षे ३८, सध्या रा. पुणे) या कामगाराला जबर मारहाण केली. प्रामाणिक काम करूनही मालकाने केलेल्या मारहाणीचा धसका घेऊन प्रभाकर याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पुण्यात घडली. 

     या प्रकरणाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणे येथे हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्यां चंदगड तालुक्यातील कामगारापर्यंत पोहोचताच संबंधित मालकाविरोधात सर्व कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत पुण्यात आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. अखेर भारती विद्यापीठ ठाण्यात तक्रार दाखल झाली असून सोमवार दि. २५ रोजी चंदगड पोलिसात देखील फिर्याद दिली आहे. प्रभाकर यांने मालकाकडून ६० हजार रुपये अॅडव्हान्स घेतला होता. आई आजारी असल्याने ते महिनाभर कामावर गेले नव्हते. २० ऑक्टोबरला गेले असता हजर करून घेतले नाही. त्या दिवशी रात्री संबंधित हॉटेल मालक व व्यवस्थापकाने महिन्याचा व्यवसाय बुडाला म्हणून प्रभाकर याला लोखंडी बारने जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या काना-नाकातून रक्त वाहू लागले होते. नैराश्यातून त्यांने गुरुवारी आत्महत्या केली.

No comments:

Post a Comment