कोवाड येथील केडीसी बँकेच्या शाखेतील बंद प्रिंटर मुळे ग्राहकांची गैरसोय - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2021

कोवाड येथील केडीसी बँकेच्या शाखेतील बंद प्रिंटर मुळे ग्राहकांची गैरसोय



कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

           कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोवाड (ता. चंदगड) शाखेतील वारंवार बंद पडणाऱ्या प्रिंटर मुळे ग्राहकांची कुचंबणा होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षापूर्वी बँकेत सेव्हींग व अन्य खात्यातील व्यवहाराची नोंद पासबुकात हस्तलिखित स्वरूपात केली जायची, पण अलीकडे डिजिटल प्रणाली सुरू झाल्यामुळे ग्राहकांना स्पष्ट अक्षरात आपल्या व्यवहाराच्या नोंदी पहायला मिळत आहेत. तथापि कोरोना काळासह गेल्या दोन वर्षात कोवाड शाखेतील प्रिंटर वारंवार बंद असल्याचे सांगितले जाते. 

         यामुळे ग्राहकांना नाहक हेलपाटे मारावे लागतात. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन होतोच तर काही वेळा पासबुक वरील नोंदी आभावी आर्थिक व्यवहार तसेच शासकीय व अन्य संस्थांशी संबंधित ऑडिट कामे रखडली जात आहेत. याचा मोठा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रिंटर सेवा निरंतर सुस्थितीत ठेवण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. हीच स्तिथी तालुक्यातील इतर शाखांतूनही असल्याच्या तक्रारी आहेत.



No comments:

Post a Comment