कोवाड येथे ग्रामपंचायत कामगारांच्या तालुका स्तरीय मेळाव्यात कोविड योद्ध्यांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2021

कोवाड येथे ग्रामपंचायत कामगारांच्या तालुका स्तरीय मेळाव्यात कोविड योद्ध्यांचा सन्मान

कोवाड येथे ग्रामपंचायत कामगार संघ तालुकास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन करतांना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका ग्रामपंचायत कामगार संघाच्या (इंटक सलग्न) तालुकास्तरीय मेळाव्यात कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक भवन कोवाड (ता. चंदगड) येथे झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ अनिता भोगण होत्या.

कोविड योध्द्यांचा सन्मान करताना मान्यवर. 

          दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे जि. प. सदस्य कल्लाप्पांना भोगण व विद्या पाटील यांचे हस्ते झाले. स्वागत संघटनेचे तालुकाध्यक्ष परशराम जाधव यांनी केले. प्रास्ताविक करताना जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी १९५२ साली स्थापन झालेल्या या संघटनेने ग्रामपंचायत कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून प्रलंबित प्रश्नांची निर्गत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पाठीशी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्त्या व उत्साळी गावच्या सरपंच माधुरी संतोष सावंत- भोसले यांनी कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी केलेल्या कार्याचे कौतुक करताना सरपंच व कमिटीने कामगारांचा सन्मान करण्याची अपेक्षा असताना उलट तेच सरपंचांचा सन्मान करत आहेत. यातून सरपंच संघटनेने बोध घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. 

    जि. प. स्थायी समिती सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी जिल्हापरिषद स्तरावरील कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. भोगण यांच्या वतीने मेळाव्यास उपस्थित बागीलगे, डुक्करवाडी पासून कामेवाडी, राजगोळी आदी साठ गावातील ५०० कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी विद्या पाटील, साहित्यिक पांडुरंग जाधव, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, ग्रामपं. सदस्या सुवर्णा पाटील, रंजना पाटील आदींची भाषणे झाली. संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत कामगार, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पत्रकार, पोलीस यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाची सुरुवात केंद्र शाळा व श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमास पंस. सदस्या नंदिनी पाटील, कोवाडचे उपसरपंच पुंडलिक जाधव, सर्व सदस्य, संघटना पदाधिकारी तानाजी वाईंगडे, संजय दळवी, शिवाजी कांबळे, एकनाथ राघोजी, संजय कांबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या राजगोळकर यांनी केले. आभार ग्राम विकास अधिकारी जी. एल. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment