माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. डाॅ मासाळ यांची अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2021

माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. डाॅ मासाळ यांची अभ्यास मंडळ सदस्यपदी निवड

प्रा. डॉ. एन. एस मासाळ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. एस मासाळ यांची संजय घोडावत विद्यापीठांतर्गत मानव शास्त्र व सामाजिक शास्त्रे विभागाच्या कुलगुरू नियुक्त अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दलचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी त्यांची शिवाजी विद्यापीठांतर्गत भूगोल विषयामध्ये पी.एच.डी करणाऱ्या संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment