कोजिमाशि पतसंस्थेच्या कोवाड शाखेमार्फत सभासदांना दिपावली भेट वस्तू वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2021

कोजिमाशि पतसंस्थेच्या कोवाड शाखेमार्फत सभासदांना दिपावली भेट वस्तू वाटप

 

कोवाड (ता. चंदगड) येथे कोजिमाशि पतसंस्थेच्या शाखेमार्फत सभासदांना दिपावली भेट वस्तू वाटप करताना अशोकराव देसाई, बाजुला संस्थाध्यक्ष सदाशिव देसाई, चिगरे,घोळसे आदी 

चंदगड / प्रतिनिधी
दिवाळी सणासाठी सभासदांना कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या कोवाड शाळेमार्फत दिपावली भेट वस्तू म्हणून १० लिटर गोडे तेल व समृद्धी बकेटचे वाटप किणी-कर्यात शिक्षण सस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सदाशिव देसाई होते.
         यावेळी अशोकराव देसाई यानी संस्थेच्या प्रगतीतुन सभासदाचा व समाजाचा विकास करणारी एकमेव सस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. संस्थाध्यक्ष  सदाशिव गणपतराव दसाई यांनी कोजिमाशी  संस्थेने कोविड ग्रस्त शिक्षकांना रोख ५००० रु प्रमाणे २५ लाख रुपये वाटप केले असून  पुरग्रस्तांसाठी सुमारे ५0 लाख रुपये तर मयत सभासदांच्या वारसांना १ कोटी ८२लाख रूपये मदत वाटप केल्याचे सांगितले.
              यावेळी कार्यक्रमाला  हल्लाळी  सर ' वाय व्ही पाटील ' बाळसाहेब घोळसे  भोगणसर भोगुलकरसर परशराम कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. आर. चिगरे सर यांनी केले तर आभार वाय. व्ही.  पाटील यांनी मानले.


No comments:

Post a Comment