विकल्प निवडीसाठी एफ. सी. 6803 मध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फिनिशिंग स्कूल हा वेगळा उपक्रम राबविला जात आहे ज्यामध्ये भविष्यातील नवीन तंत्रज्ञानाचे कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात हा उपक्रम संगणक व ई अंड टीसी विभागासाठी चालू होता या वर्षी मेकॅनिकल सिव्हिल व इलेक्ट्रिकल या विभागासाठी सुद्धा फिनिशिंग स्कूल काम करत आहे जेणेकरून भविष्यामध्ये उद्योजक म्हणून एस. जी. एम. चा विद्यार्थी आपला वेगळा ठसा उमटवेल तसेच विविध क्षेत्रांमध्ये भरपूर प्रमाणात नोकरीच्या संधी सुद्धा प्राप्त होतील.
संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीमध्ये निवड झाली यामध्ये प्रणिता शिंत्रे व अक्षय कुमार नावगेकर यांची कॉग्निझंट, दिपाली नेवडे व सोनाली पाटील यांची टीसीएस आणि स्नेहल नार्वेकर हिची विप्रो या कंपनीत असिस्टंट सिस्टिम इंजिनिअरिंग ट्रेनी या पदावर नियुक्ती झाली. सर्वांना चार लाखाचे वार्षिक वेतन व कंपनीच्या इतर सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे.
मागील दीड वर्ष आपण कोरोणा महामारी काळा मधून जात आहे आणि शैक्षणिक महाविद्यालयांसाठी हा काळ फारच खडतर असा आहे या काळामध्ये सुद्धा विविध कंपन्यांचे मुलाखती घेण्यामध्ये व त्यांना कोरोणा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध करून देण्यामध्ये एस. जी. एम. कायमच एक पाऊल पुढे राहिले आहे यामध्ये तब्बल 34 हून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये 153 हून अधिक विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि याच कारणामुळे शैक्षणिक वर्ष 2021-22 नवीन प्रवेशासाठी प्रथम व द्वितीय वर्ष विकल्प निवडण्याची विद्यार्थ्यांची पसंती एस.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय आहे याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण यांनी एस जी एम महाविद्यालयाचे विशेष आभार व्यक्त केले.
संत गजानन महाराज शिक्षण संस्थेने दर्जेदार अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठी प्रयत्न प्रयत्न केले आहेत त्यामुळे आज पर्यंत अनेक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी नोकरीवर कार्यरत आहेत. यावेळी संस्थेचे, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याकामी प्राचार्य डॉ. संजय सावंत, प्रा. संतोष गुरव प्रा. महादेव बंदी, सर्व विभागप्रमुख व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
No comments:
Post a Comment