मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तालुका संघाची फिरती शाखा सुरू करणार - आमदार राजेश पाटील, तालुका संघाची ६२वी ऑनलाईन सभा - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2021

मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तालुका संघाची फिरती शाखा सुरू करणार - आमदार राजेश पाटील, तालुका संघाची ६२वी ऑनलाईन सभा

 

शिनोळी (ता. चंदगड) येथे तालुका खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष राजेश पाटील.

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक उलाढाल ७२ कोटींवर गेली असून सहकार क्षेत्रातील ही जिल्ह्यातील एकमेव संस्था असेल जी ५० ते ५८ लखांचा नफा मिळवत असून शेतकरी, सभासद व कामगार यांच्या सहकार्यातून चंदगड तालुका संघ १०० कोटींचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करेल. असा विश्वास तालुका संघाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश पाटील यांनी केले. शिनोळी ता.चंदगड येथे चंदगड तालुका संघाच्या ६२व्या ऑनलाईन सभेत ते बोलत होते.

शिनोळी (ता. चंदगड) येथे तालुका खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी उपस्थित सभासद.

     प्रारंभी व्यवस्थापक एस. वाय. पाटील यानी स्वागत करून अहवाल वाचन केले. आम. पाटील पूढे म्हणाले कोरोना काळात शेतकऱ्यांना व सामान्य ग्राहकांना मदत होईल या दृष्टीने संघाच्या प्रत्येक शाखेमार्फत सेवा दिली गेली. या कालावधीत सर्व व्यवहार बंद असताना शेतकऱ्यांसाठी खते तसेच सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तू संघाच्या शाखा व तुळशी बाजारच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या. यामध्य संघाच्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता. कोरोनाचा धोका लक्षात घेत या काळात सर्व कामगारांना ईएसआय पॉलिसी संघामार्फत लागू करण्यात आली होती. तसेच कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा विचार करतात सर्वांना १२ टक्के डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कामगारांना ५ टक्के पगारवाढ देखील यावेळी जाहीर करण्यात आली.तालुका संघाच्या शाखा विस्तरण्याचा मानस असून गडहिंग्लज, आजरा या ठिकाणी शाखा काढण्यासाठीचा ठराव संमत करण्यात आला. तर खत विक्री संदर्भात अनेक खाजगी विक्रेत्यांनी एजेंसी मागितली. मात्र आपण आपल्या संघाच्या शाखांमर्फतच खत विक्री केली जात आहे. तसेच तुलसी बाजारच्या माध्यमातून प्रत्येक शाखेच्या ठिकाणी मॉल बांधण्याचा प्रयत्न असून संघाच्या शाखेजवळ जागा उपलब्ध झाल्यास मॉल आणि गोडावन बनवून देवू असेही त्यांनी यावेळी नमूद केलेयावेळी आपल्या भागात संघाच्या माध्यमातून माती परीक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असून त्यातून खताच्या उत्पादनात आणखी सुधारणा  केली जाऊ शकते. तर फिरती शाखा मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी संघाच्या अडत बाजारात बटाटे व रताळी घातलेल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर दोन कोटींच्या वर उलाढाल असलेल्या शाखांचा संघामार्फत सन्मान करण्यात आला. यावेळी तानाजी गडकरी, परशराम पाटील, महादेव चौकुळकर, गोपाळ गावडे, जानबा चौगुले, विठोबा गावडे, अभय देसाई, राजीव  जाधव, अल्ली मुल्ला, नारायण पाटील, रामचंद्र  बेनके, विठ्ठल पावले, पुंडलिक सा. पाटील, बाळासो रा. घोडके, दयानंद पाटील, राजाराम पाटील, श्रीमती विजयमाला कोकीतकर, विद्या चिटणीस आदी संचालक उपस्थित होते.उपाध्यक्ष पोमाना पाटील यानी आभार मानले.



No comments:

Post a Comment