गडहिंग्लज बाजार समितीत जवारी लाल मिरचीचा पुन्हा तडका, चालु हंगामातील उच्चांकी दर - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2021

गडहिंग्लज बाजार समितीत जवारी लाल मिरचीचा पुन्हा तडका, चालु हंगामातील उच्चांकी दर

चालु हंगामातील उच्चांकी दर मिळालेली जवारी लाल मिरची

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सिमेलगत असलेली गडहिंग्लज कृषि उत्पन्न बाजार समिती ही पुर्वी पासुनच मिरची करीता प्रसिध्द आहे. सद्या मिरची हंगाम जोरात चालु असुन काल गडहिंग्लज मुख्य बाजार आवारामध्ये  बी. पी. शहा यांच्या दुकानात आवक झालेली जवारी मिरची उत्पादक शेतकरी  बसवराज लक्ष्मण चौगुले (रा. बसर्गे ता. गडहिंग्लज) यांच्या जवारी मिरचीला चालु हंगामातील रु. १,२२,०००/- प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला आहे. सदरची मिरची खरेदीदार जब्बार ट्रेडर्स यांनी खरेदी केली.  


              आज रोजी एकुण ८२९ पोती मिरची आवक विक्री होवून किमान ७,००० ते कमाल १,२२,००० पर्यंत दरदाम झाले. चालू हंगामी आज अखेर एकुण मिरची पोती ५,८५३ आवक विक्री झाली आहेत. यावेळी सौदया करीता व्यापारी  रोहीत मांडेकर, राजन जाधव, अरविंद आजरी, महेश मोर्ती, बी. पी. शहा, व्ही. के. चाथे, शिवानंद मुसळे, श्रीकांत येरटे, अमर मोर्ती, संजय खोत,,मुन्ना बागवान जफीर बागवान, अस्लम बागवान, जावेद मुगळे तसेच समितीचे सौदा विभाग प्रमुख शैलेश देसाई, प्रविण पुजारी व तोलारी सागर खमलेटी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment