 |
ताम्रपर्णी नदीकाठावर बांधलेले मंदिर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जागृत देवस्थान वीरदेव मंदिराचे कळसारोहण व धार्मिक विधी शनिवार व रविवार २५ व २६ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न होणार आहे.
 |
श्री वीरदेव |
२५ रोजी सकाळी ८ वाजता कुंभ पूजन व कळस मिरवणूक रात्री ८ वाजता भजन संध्या हा गावातील भजनी मंडळांचा कार्यक्रम. २६ रोजी सकाळी आठ वाजता मृत्युंजय हवन मंदिराचे मानकरी तुकाराम कल्लाप्पा कांबळे, दत्तू केशव कांबळे, अर्जुन धोंडीबा कांबळे, कल्लाप्पा यमाजी कांबळे, कल्लाप्पा श्रीपती कांबळे, कल्लाप्पा वसंत कांबळे, संजय लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते तर मूर्ती अभिषेक मारुती विठोबा कांबळे, नामदेव दत्तू कांबळे, दिलीप रवळू कांबळे, विजय विठ्ठल कांबळे, विठ्ठल मारुती कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. ११ वाजता मंदिराच्या कळसाचे आरोहण करण्यात येणार आहे. सर्व विधी सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, मरुळा संस्थान हिरेमठ- खानापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जयदेव स्वामी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विरदेव यात्रा कमिटी व कांबळे समाज कालकुंद्री यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment