जंगमहट्टीचे माजी सरपंच विठ्ठल गावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2021

जंगमहट्टीचे माजी सरपंच विठ्ठल गावडे यांचे निधन

कै. विठ्ठल पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील विठ्ठल रवळू गावडे (वय - ७५ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी काही वर्षे गावचे सरपंचपद अगदी सक्षमपणे पार पाडले होते. एकत्र कुटूंबासाठी ते आदर्श होते. त्याबरोबरच ते सध्या गावातीत दूध संस्था व सेवा सोसायटीचे संचालक होते. शांत, मनमिळावू असणाऱ्या त्यांच्या मृत्यूने जंगमहट्टी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात, पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, तीन विवाहीत मूली, तीन विवाहीत भाऊ असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दि. २४ रोजी आहे.

No comments:

Post a Comment