चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. एस. एस. सावंत सावंत यांना पीएचडी - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2021

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. एस. एस. सावंत सावंत यांना पीएचडी

एस. एस. सावंत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. संभाजी शिवाजी सावंत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादची (विद्यावाचस्पती), पीएच. डी. पदवी नुकताच जाहीर झाली.

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख असलेल्या प्रा. एस. एस. सावंत यांनी "*कोल्हापूर विभागातील भात प्रक्रिया व्यवसायाचा आर्थिक अभ्यास* या विषयावर आपला प्रबंध डॉबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादला सादर केला होता. यांना गोदावरी कला महाविद्यालय,अंबड जि.जालना येथील अर्थशास्त्रविभागप्रमुख प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉपी. आर. पाटील यांचे तसेच  संस्थेचे सर्व संचालक व सहकारी प्राध्यापक यांचे प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment