कळसगादे अशोक दळवी यांना सलग चौथ्या वर्षी एम. डी. आर. टी. अमेरिका बहुमान - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2021

कळसगादे अशोक दळवी यांना सलग चौथ्या वर्षी एम. डी. आर. टी. अमेरिका बहुमान

अशोक दळवी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          भारतीय आयुर्विमा महामंडळाचे प्रतिनिधी अशोक दळवी यांनी कळसगादे चंदगड सारख्या ग्रामीण भागामध्ये  काम करत सलग चौथ्यांदा ३०२१-२२ चा भारतीय  आयुर्विमा महामंडळामार्फत दिला जाणारा एम. डी. आर. टी. अमेरिका हा बहुमान पुरस्कार मिळवला. ते गेली सतरा वर्षे एल आय सी कडे एक उत्कृष्ट विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

         भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मार्फत २२०० लोकांना विम्याची सेवा देत आहेत. लोकांनी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हावं, त्यासाठी पैशाचे योग्य नियोजन मूल्यमापन करावे. यासाठी ते मनी मास्टरी कोर्स विनामुल्य ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन एल. आय. सी. ने अमेरिकेमध्ये होणाऱ्या बोस्टन येथील संमेलनासाठी त्यांची निवड केली. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी विमाविकास अधिकारी अरुण उबाळे, गडहिंग्लज शाखा व्यवस्थापक दिलीप मोरे, चंदगड शाखा व्यवस्थापक किरण औचित्य, आजरा शाखा व्यवस्थापक सदानंद गायकवाड व सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. अशोक दळवी हे उत्तम लेखक व कवी आहेत.

No comments:

Post a Comment