मौजे कारवे येथे दुचाकी घसरून मांडेदुर्ग येथील शिक्षकाचा जागीच मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2021

मौजे कारवे येथे दुचाकी घसरून मांडेदुर्ग येथील शिक्षकाचा जागीच मृत्यू

 

जोतीबा रामु कडगांवकर

चंदगड / प्रतिनिधी

           ढोलगरवाडी फाट्यावरून मांडेदूर्ग कडे दुचाकीवरून जात असताना मौजे कारवे (ता. चंदगड) येथील मोरीवर कुत्र्याला धडक बसून झालेल्या अपघातात मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक जोतीबा रामु कडगांवकर (वय वर्षे  ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल मंगळवार दि.२८ रोजी घडला.

       याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी रात्री ११.४०वाजण्याच्या सुमारास जोतीबा कडगांवकर हे आपले  वैयक्तिक काम आटोपून आपल्या गाडी नं.एम एच ०९ सी एन.७७२३या दुचाकीवरून मांडेदुर्ग गावी जात असताना मौजे कारवे गावाजवळील मोरीवर आले असता अचानक कुत्र्याने गाडीला धडक दिली.या धडकेत जोतीबा गाडीवरून जोराने दुर फेकले गेले.यावेळी त्यांचे डोके दगडावर आपटल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला.मयत जोतिबा याच्या पश्चात आई, पत्नी,दोन मूले असा परिवार आहे.ते हाजगोळी येथील  प्राथमिक शाळेत अध्यापक होते. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.

No comments:

Post a Comment