साहित्यरत्न चंदगड मार्फत काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन, कधी होणार स्पर्धा......वाचा... - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2021

साहित्यरत्न चंदगड मार्फत काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन, कधी होणार स्पर्धा......वाचा...

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        साहित्य रत्नं चंदगड व मराठी अध्यापक संघ, चंदगड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित नववर्षांची कोवळी स्वप्ने घेऊन नव्या उत्साहाने सुरवात करताना विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ८ जानेवारी 2022 रोजी दु.१२ वा. महात्मा फुले विद्यालय कार्वे येथे सहभागी विद्यार्थानी उपस्थित रहावे.

         लहान गट ५वी ते ८वी तसेच मोठा गट९ वी ते १२वी ह्या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. कविता वाचन किंवा कविता गायन या कोणत्याही प्रकारातून तुम्ही सादरीकरण करू शकता. विद्यार्थ्यांनी  दि. ७ जानेवारी पूर्वीआपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, फोन.नं व कवितेचे नाव  नोंद करावे. असे आवाहन  साहित्यरत्नचे अध्यक्ष संजय साबळे व सचिव प्रमोद चांदेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment