जून्या पेन्शनसाठी चंदगड तालुका शिक्षक परिषदेकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन, माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांना परिषदेने फोडली वाचा - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2021

जून्या पेन्शनसाठी चंदगड तालुका शिक्षक परिषदेकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन, माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांना परिषदेने फोडली वाचा


आमदार राजेश पाटील याना विविध मागण्यांचे निवेदन देताना माध्यमिक शिक्षक परिषदेचे शिक्षक


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे मार्फत आमदार राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

         १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शाळेतील शिक्षकांना  जूनी पेन्शन योजना लाभ देण्यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा यासाठी चंदगड तालुका शिक्षक परिषदेमार्फत तालुका आमदार राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, कोरोना कामगिरीवर असताना विमा सरंक्षण, विना अनुदान शाळांना अनुदान मिळणे, संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेणे, ग्रंथपालांच्या मागण्या, सातवा वेतन आयोग थकलेला हप्ता देणे, अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता, कॅशलेश व आरोग्य विमा लागू करणे इ.३२ मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत चंदगड मतदारसंघाचे विधानसभा आमदार राजेश पाटील यांच्याकडे दिले. माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न परिषदेमार्फत पोटतिडकिने मांडण्यात आले.  यावेळी  परिषदेचे अध्यक्ष टी. टी. बेरडे, उपाध्यक्ष मनोहर भुजबळ, सचिव संजय साबळे, खजिनदार पी. वाय. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष टी. एल. तेरणीकर, प्राचार्य आर. आय. पाटील, एन. डी. देवळे, परिषदेचे टी. एस. चांदेकर, सुभाष बांदिवडेकर, ए. जी. देवण, एस. के. हरेर, रवि पाटील, एस. बी. भोसले, आर. पी. पाटील, टी. व्ही. खंदाळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment