संजय साबळे यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2021

संजय साबळे यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार

संजय साबळे यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          मराठी साहित्य राज्यस्तरीय कवी कट्टा २०२१ च्या मंचावर राजर्षी  शाहू  वाचनालय गारगोटी येथे संजय साबळे यांच्या' *काही बोलायचे आहे* 'या काव्यसंग्रहाला *महाराष्ट्र साहित्य प्रेरणा पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले. 

     श्री. साबळे दि न्यू इंग्लिश स्कूल येथे सहाय्यक शिक्षक म्हणून गेली सतरा वर्ष कार्यरत आहेत. त्यांची एकूण दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यावेळी बजरंग देसाई, हिंदूराव पाटील, भुदरगड पंचायत समितीच्या सभापती आशाताई नलवडे, कोजिम अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रा. चंद्रकांत पोतदार, सलीम जमादार, संभाजी सुतार, प्रा. श्याम पाटील, बी. एन. पाटील, जयवंत जाधव, अमोल पाटील व इतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment