हलकर्णी फाटा येथे जॉन्सन पेडर कंपनीची प्लंबर कार्यशाळा संपन्न, कार्वे येथील राधाकृष्ण ट्रेडींग कॉर्पोरेशन कडून नियोजन - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2021

हलकर्णी फाटा येथे जॉन्सन पेडर कंपनीची प्लंबर कार्यशाळा संपन्न, कार्वे येथील राधाकृष्ण ट्रेडींग कॉर्पोरेशन कडून नियोजन

कार्यशाळेला उपस्थित प्लंबर


मजरे कार्वे / सी. एल. वृत्तसेवा

         मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील राधाकृष्ण ट्रेडिंग कार्पोरेशन व बाथरूम साहित्य तयार करणारी अग्रेसर कंपनी जॉन्सन पेडर यांच्या संयुक्त विद्यमानाने हलकर्णी फाटा येथे प्लंबर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी चंदगड तालुक्यातील विविध ठिकाणाहून व सीमा भागातून प्लंबर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जॉन्सन पेडर कंपनीचे अधिकारी.

              स्वागत व प्रास्ताविक राधाकृष्ण ट्रेडिंग कार्पोरेशन चे प्रोप्रा निवृत्ती हारकारे यांनी करून गेल्या वर्षभरात सर्व प्लंबर बांधव व ग्राहकांच्या सहकार्याने चंदगड तालुक्यातील कानाकोपऱ्यात जॉन्सन पेडर व सुप्रीम कंपनीची उत्पादने पोहचविण्याचे काम केले आहे. याचे खरे श्रेय हे प्लंबर बांधवांना जाते असे सांगून सर्व प्लंबर बांधवांनी एकत्र येऊन काम करावे, एकजूट असेल तर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. अनेक शक्ती तुमच्यात फूट पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापासून सावध रहा. भविष्यात जॉन्सन पेडर हा चंदगड तालुक्याचा फेव्हरिट ब्रँड व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

राधाकृष्ण ट्रेडिंग कार्पोरेशनचे मालक निवृत्ती हारकारे बोलताना. 

        यावेळी जॉन्सन पेडर कंपनीचे अधिकारी राहुल कुंभार यांनी जॉन्सन पेडर कंपनी ही 1970 सालची स्पेनची कंपनी आहे. बाथरूम साहित्यातील सर्व साहित्य स्वतः तयार करणारी ही एकमेव कंपनी आहे. कंपनीने गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. म्हणून 175 पेक्षा अधिक देशांमध्ये या कंपनीचा बोलबाला आहे. भारतातील कंपनीचे विक्री उद्दिष्ट दोनशे टक्के पेक्षा जास्त पूर्ण झाले असल्याने सध्या बाजारात सर्वात वरच्या क्रमांकावर जॉन्सन पेडर कंपनीचा नंबर लागतो. 900 पेक्षा जास्त उत्पादने तयार करणारी व स्वतः तयार करणारी ही कंपनी एकमेव कंपनी आहे. जॉन्सन पेडर ची सिरामिक उत्पादने 1210 डिग्री सेल्सिअसला भाजून तयार केलेली असतात. सिरॅमिक उत्पादनामध्ये भाजणी सगळ्यात महत्त्वाची असते. त्यामुळे ही उत्पादने चिरकाल टिकतात. मिक्सर, नळ आदी उत्पादने शंभर टक्के ब्रास मध्ये बनवलेली असतात. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस ही कंपनी उतरली आहे. असे सांगून कंपनीने तयार केलेल्या बाथरूम साहित्याची ओळख करून दिली. या कार्यशाळेत प्लंबर बांधवांनी विचारलेल्या अनेक शंकांचे निरसन राहुल कुंभार यांनी यावेळी केले. कार्यशाळेस कंपनीचे अधिकारी मुराद काजी, विलास कागणकर, विनोद टक्केकर, दिलीप कदम, संजय जाधव, मयूर इंजल यांचे सह प्लंबर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार साई हारकारे यांनी मानले.

No comments:

Post a Comment