कोल्हापूर येथील चंदगड भवनाच्या दोन मजल्यांचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल - आमदार राजेश पाटील यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2022

कोल्हापूर येथील चंदगड भवनाच्या दोन मजल्यांचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल - आमदार राजेश पाटील यांची मागणी

मागणीचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देताना आमदार राजेश पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीचे उभारण्यात आलेल्या चंदगड भवनच्या वरील दोन मजल्याच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार राजेश पाटील यानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे केली.
            चंदगड भवनच्या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उर्वरित खोल्यांसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला अनुसरून जिल्हा परिषदेमार्फत  योग्य तो प्रस्ताव, ९८ लाख ४७ हजार ९५२ इतके अंदाजपत्र आणि मागणीचेपत्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द करून आचारसंहितेच्या अगोदर मंजूर करून उपकृत करण्यासंबंधी विनंती आमदार राजेश पाटील केली आहे.


No comments:

Post a Comment