किल्ले पारगड येथे भवानी यात्रेनिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2022

किल्ले पारगड येथे भवानी यात्रेनिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

किल्ले पारगडवरील तोफा.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          किल्ले पारगड येथे भवानी देवीच्या यात्रेनिमित्त दि. १५ व १६ फेब्रुवारी  रोजी कोरेनाच्या नियमांचे पालन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती किल्ले पारगड जन कल्याण संस्थेचे अध्यक्ष कान्होबा शंकर माळवे यांनी दिली. 

         मंगळवार दि. १५ रोजी रोजी सकाळी ९ वाजता कान्होबा माळवे यांच्या हस्ते भवानी माता चांदीच्या मखराचे अनावरणाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.

            सकाळी ९.३० वाजता भवानी देवीचा लघुरुद्राभिषेक पुरोहित संजय माधव मणेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वास आढाव यांच्या हस्ते होणार  आहे. दुपारी २ वाजता महाआरती, ४ वाजता बिपीन चिरमुरे यांच्या हस्ते महादरवाजा व सदरेवरील तोफांचे अनावरण होणार आहे. ५ वाजता  स्वराज्यामाता जिजाऊ व बाल शिवरायांच्या शिल्पाचे अनावरण श्रीमती उषा वसंत नांगरे यांच्या हस्ते, रात्रौ १२वाजता महाप्रसाद व उत्तर रात्री २ वाजता भवानी देवीचा गोंधळ होणार आहे. तर बुधवार दि. १६ रोजी रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते वनदेवता व तुलसी पूजन, महाआरती, दुपारी १२ वाजता व २ वाजता सुरेश चिरमुरे व प्रेमानंद कदम (घोटगेवाडी) पुरस्कृत महाप्रसाद होणार आहे. रात्रौ ११.00 वाजता गोवा येथील नाट्यतरंग प्रस्तुत "आकाशमिठी" हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे.

No comments:

Post a Comment