चंदगड युवासेनेच्या चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कोण आहे हे पदाधिकारी...... - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2022

चंदगड युवासेनेच्या चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कोण आहे हे पदाधिकारी......


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        युवासेनेतील वरिष्ठां पदाधिकाऱ्यांच्या सापत्न वागणूकीमुळे चंदगड तालुका युवासेनेच्या ४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद गावडे (तालुका समन्वयक), निलेश पाटील (तालुका समन्वयक), आकाश गावडे (सोशल मिडिया समन्वयक), भरमु आपटेकर (तालुका चिटणीस) या चौघां पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले.
      या चौघांनी आपल्या पदाचे राजीनामे युुुवासेना जिल्हाप्रमुख दिनेश कुंभिरकर, विस्तारक डाॅ. सतीश नरसिग यांचेकडे सोपविले आहेत. गेल्या काही वर्षांपासून युवासेना संघटनेमध्ये आम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहोत. पण गेल्या काही दिवसांपासून आम्हाला युवा सेनेच्या कार्यक्रमातून वगळून अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. तसेच तालुका निर्णय प्रकियेत आपली दखल घेतली जात नसल्याने आपण सामूहिक राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. या राजीनाम्यामुळे आगामी जि. प. व पं. स. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुका शिवसेनेला मोठा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.No comments:

Post a Comment