चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शिवनगे (ता. चंदगड) येथील श्री जक्कुबाई कब्बड्डी संघामार्फत ताम्रपर्णी विद्यालयाच्या मैदानावर सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी खुल्या गटासाठी कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला १००००, ७०००, ५०००, ३००० अशा बक्षिसासह वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत एक गाव एक संघ खेळणार असल्याने खेळाडूनी सोबत आधारर्काड आणणे आवश्यक आहे. अधिक माहीतीसाठी संपर्क 7350402568 या भ्रमणध्वनीवर साधावा असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment