सहाय्यक निबंधकांच्या आश्वासनानंतर रेंगडे यांचे उपोषण मागे, कशासाठी केले होते उपोषण.......... - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2022

सहाय्यक निबंधकांच्या आश्वासनानंतर रेंगडे यांचे उपोषण मागे, कशासाठी केले होते उपोषण..........

चंदगड येथे ऊस  रेंगडे यांचे बिलाच्या रकमेसंदर्भात सूरू असलेल्या अंदोलनस्थळी सहाय्यक निबंधक काटकर यानी भेट घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        अडकूर (ता. चंदगड) येथील अडकुर विकास सेवा संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक ऊस बिलाची रक्कम अडकून ठेवली आहे. त्याची चौकशी होऊन कारवाई करावी या मागणीसाठी  बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून चंदगड तहसील कार्यालयासमोर पद्मजा रेंगडे यांचे सूरू असलेले आमरण सहाय्यक निबंधक श्रीमती काटकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आज मागे घेण्यात आले. 

        खोटे लेखी पुरावे तयार करून माझ्यासह कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असणाऱ्या ऊस बिलांच्या रक्कमा बेकायदेशीरपणे सोसायटीकडे वर्ग केलेले आहेत. माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे केल्याचा आरोप रेंगडे यांनी केला आहे. दरम्यान यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश दळवी, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, कल्लाप्पा भोगण, माजी सभापती शांताराम पाटील, पं. स. सदस्य बबनराव देसाई, शिवराज देसाई, अनिल शिवणगेकर, रवी नाईक, अनिल रेंगडे, कृष्णा रेगडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment