आजरा साखर कारखान्याने केले १०० दिवसात ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, उशीरा गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ५० रु अनुदान - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2022

आजरा साखर कारखान्याने केले १०० दिवसात ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, उशीरा गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ५० रु अनुदान

प्रा. सुनिल शिंत्रे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        गेले दोन हंगाम बंद असलेला आजरा सहकारी साखर कारखान्याने चालु २०२१-२२ या गळीत हंगामात १०० दिवसात २९,३९६० मेट्रिक टनाचे गाळप करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. १५ जानेवारी २०२२ अखेर आलेल्या उसाची बिले तोडणी वाहतुकीची बिले अदा केली आहेत.                        कंत्राटदार, व्यापारी यांची बिले आणि कर्मचाऱ्यांचे मासिक पगार वेळेत अदा केले आहेत. कारखान्याचे  अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे व संचालक मंडळाने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे तसेच ३१ जानेवारी २०२२ ची बिले देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. 

           कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उस गाळपासाठी आणण्याचे नियोजन केले असून शेतकऱ्यांना विलंबाने ऊस गाळपासाठी गेलेची चिंता नसावी. यासाठी दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून पुढे येणाऱ्या  ऊसाला रुपये ५०/- मे. टन विलंब अनुदान म्हणून दिले जाणार आहे. कारखाना अत्यल्प कालावधीत कमी खर्चात १०० दिवसात जवळपास ३ लाखाचा टप्पा पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे चांगली रिकव्हरी ठेवण्यात देखील यशस्वी  झालेला आहे.  तसेच वेळेत ऊसबिल व तोडणी वाहतूक बिले दिलेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तसेच ऊस तोडणी मजूर कंत्राटदार आणि पगार वेळेत होत असलेने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरणआहे.

No comments:

Post a Comment