ब्लॅक पॅंथरच्या वतीने ठिय्या आंदोलनाला खासदार संजय मंडलिक यांचा पाठिंबा - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2022

ब्लॅक पॅंथरच्या वतीने ठिय्या आंदोलनाला खासदार संजय मंडलिक यांचा पाठिंबा

खासदार संजय मंडलिक यांनी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई, विजय माने, प्रविण कांबळे, विजय घाटगे, पुंडलिक नाईक, दिपक कांबळे, सुजाता ढोले, सायरा तहसिलदार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            शेतकरी व उद्योगपती प्रमाणे महिला बचत गटांची कर्जमाफी करून बळजबरीने व बेकायदेशीररित्या वसूल करणाऱ्या फायनान्स कंपन्यावर पुण्याच्या धर्तीवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. रिक्षा व्यावसायिकांना दररोज ५ लिटर गॅस, पेट्रोल व डिझेल निम्म्या किमतीत द्यावे. इत्यादी विविध मागण्या संदर्भात बेमुदत ठिय्या आंदोलनाबाबत ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलना कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजय  मंडलिक यानी पाठींबा दर्शविला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते अॅड. सुरेशराव कुराडे निवेदन देताना ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई, विजय माने, प्रविण कांबळे, विजय घाटगे, पुंडलिक नाईक, दिपक कांबळे, सुजाता ढोले, सायरा तहसिलदार तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment