चंदगड येथील रवळनाथ यात्रेला परवानगी द्या! शिवप्रतिष्ठानचे तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2022

चंदगड येथील रवळनाथ यात्रेला परवानगी द्या! शिवप्रतिष्ठानचे तहसिलदारांना निवेदन

चंदगडच्या रवळनाथ यात्रेला परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देताना शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

              चंदगड शहर तसेच ८४ खेड्यांचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ ची दि. २३ ते २७ फेब्रुवारी रोजी होणारी माही यात्रा परंपरागत मोठ्याने करण्यास परवानगी द्यावी. या आशयाच्या मागणीचे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चंदगड च्या वतीने नुकतेच चंदगड चे तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.

            गेली दोन वर्षे कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर श्री देव रवळनाथ ची यात्रा रद्द करण्यात आली होती. तथापि यावर्षी कोरोनाचा प्रकोप कमी झालेला आहे. यामुळे कर्नाटक राज्यातील अनेक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या श्री देव रवळनाथ यात्रेला परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी परवानगी देऊन ग्रामस्थ व भाविकांची मागणी पूर्ण करावी. शिवप्रतिष्ठान चंदगडचे कार्यवाहक अनिकेत प्रकाश घाडगे यांची सही असलेले निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार चंदगड यांना दिले. प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे हजारो भाविकांसह चंदगड तालुका व परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:

Post a Comment