अडकूर येथे शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2022

अडकूर येथे शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          अडकूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात पंचायत समिती चंदगडचे माजी सभापती आणि विदयमान सदस्य  बबनराव देसाई यांच्या सहकार्याने अडकूर येथील गंगा - कृष्ण फौंडेशन व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे आरोग्य तपासणी शिबीर सर्वासाठी खुले असून अडकुर पंचक्रोशीतील तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गंगा - कृष्ण फौंडेशनचे अध्यक्ष आर. के. देसाई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment