चंदगड नगरपंचायतीच्या वतीने संजय साबळे यांची पर्यावरण दूत म्हणून निवड......वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2022

चंदगड नगरपंचायतीच्या वतीने संजय साबळे यांची पर्यावरण दूत म्हणून निवड......वाचा......

पर्यावरण दुत म्हणून निवड झालेल्या संजय साबळे यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करताना नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर,  उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, अभिजीत गुरबे, नेत्रा कांबळे, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील आदी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत केलेल्या कौतुकास्पद योगदानाबद्दल व जिंगल सर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते संजय साबळे यांना  सन्मानित करण्यात आले.

      चिमणी वाचवा, प्लॅस्टिक हटाव मोहिम, बिया संकलन, रोपे तयार करणे, सीड बॉल तयार करणे, औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन, वाढदिवसाला रोप भेट देणे, इको फ्रेंडली गणपती, पर्यावरण वाचवा पथनाट्य सादरीकरण, आषाढी एकादशीला वारकऱ्यांना औषधी वनस्पती वाटप असे पर्यावरणासंदर्भात अनेक यशस्वी उपक्रम श्री. साबळे यांनी राबविले आहेत. या सर्वांची दखल घेऊन चंदगड नगरपंचायत कडून त्यांना पर्यावरण दूत म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, अभिजीत गुरबे, नेत्रा कांबळे, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment