कडलगे बुद्रुकमध्ये २६ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2022

कडलगे बुद्रुकमध्ये २६ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ

विकासकामांना प्रारंभ करताना आ. राजेश पाटील, शेजारी जि. प. सदस्य अरुण सुतार, सरपंच सुधीर गिरी, परशराम पाटील, रेश्मा पाटील आदी.

कागणी : सी. एल.  वृत्तसेवा

          कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार यांच्या निधीतून 26 लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.  

           गावातील मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरणसाठी आमदार निधीतून १५ लाख रु., जिल्हा परिषद सदस्य सुतार यांच्या फंडातून अंगणवाडीच्या नवीन इमारत बांधकामासाठी ८ लाख 50 हजार रुपये तर दलित वस्ती मध्ये गटर बांधकामासाठी जिल्हा परिषद फंडातून ३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांना बुधवार दि. १६ रोजी प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सुधीर गिरी, उपसरपंच रेश्मा पाटील, ग्रामसेवक सुनील पुजारी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिकू गावडे, शिनोळी बुद्रुकचे सरपंच परशराम पाटील, तूर्केवाडीचे बाळू चौगुले, कार्वेचे  बेनके, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, माजी प्राचार्य ए. एस. पाटील, बंकट हिशेबकर, नागोजी येटले, अशोक पाटील, मनोहर इक्के, तानाजी पाटील, मनोहर पाटील, केशव पाटील, नरेंद्र हिशेबकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भिमाना पाटील, तुकाराम सुतार, एकनाथ कांबळे, चंद्रभागा पाटील, मीराताई कांबळे, शालन बुवा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment