ढोलगरवाडी येथे विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार राजेश पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कामाचा बाबतीत आम्ही कमी पडणार नाही. तसेच काम मंजूर झाल्याशिवाय कोणत्याही कामाचा शुभारंभ करत नाही. खोटी कामे करण्याची माझी संस्कृती नाही. पण काहीजन तालुक्याचा तमाशा करू पहात आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा घात केला जात आहे. कटयावर बसून मापे काढणारे खूप आहेत. पण प्रामाणिकपणे काम करणारे कमी असल्याचे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे ३९ लाखांच्या विविध विकास कामांच्या उदघाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार राजेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ. सरीता तुपारे होत्या.
यावेळी कडलगे खुर्द, कडलगे बु., ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, कार्वे येथील जवळपास २ कोटी ४० लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण व उद्धाटन सोहळा आमदार पाटील व जि. प. सदस्य अरूण सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष भिकू गावडे, जानबा चौगुले, पांडूरंग बेनके, परसू पाटील, जी. डी. पाटील आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. दिपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सदाशिव पाटील यानी केले.
No comments:
Post a Comment