चंद्रकांत कुंभार यांची राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2022

चंद्रकांत कुंभार यांची राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्षपदी निवड

ओबीसी तालुकाध्यक्षपद निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना चंद्रकांत कुंभार.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मारुती कुंभार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

        कोवाड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असलेल्या कुंभार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची या पदासाठी निवड केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदरावजी पवार यांना अभिप्रेत असलेली पक्षाची संघटना बांधणी करण्यासाठी चंद्रकांत कुंभारे सक्षम असल्याचे या निवडीने अधोरेखित झाले आहे. निवड प्रक्रियेकामी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ना. छगन भुजबळ, ना. हसन मुश्रीफ, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, चंदगडचे आमदार राजेश पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले. निवडीचे पत्र गंगाधर व्हसकोटी (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल) यांनी नुकतेच कोल्हापूर येथील कार्यक्रमात प्रदान केले. निवडीनंतर चंद्रकांत कुंभार यांनी ओबीसी समाज घटकांचे हक्क व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले. निवडीबद्दल त्यांचे तालुक्यात विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment