शेतकऱ्यांसाठी महत्वांची बातमी, पी. एम. किसान सन्मान निधी योजना ई-केवायसीला मुदतवाढ, कधीपर्यंत वाढली मुदत...........वाचा सविस्तर......... - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2022

शेतकऱ्यांसाठी महत्वांची बातमी, पी. एम. किसान सन्मान निधी योजना ई-केवायसीला मुदतवाढ, कधीपर्यंत वाढली मुदत...........वाचा सविस्तर.........



संपत पाटील / चंदगड

       प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जे शेतकरी घेत आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी ३१ मार्च २०२२ हि अंतिम तारीख होती. मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ई-केवायसी करण्यासाठीचा सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी सीएससी केंद्रासह अन्य ऑनलाईन केंद्रावर जाऊन चौकशी केली. मात्र सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी करणे शक्य झाले नाही. त्यातच आज सोमवारी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली. सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, या योजनेच्या लाभापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये. यासाठी पी. एम. किसान सन्मान निधी योजना ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी सद्यस्थितीला २२ मे २०२२ हि अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी हि दिलासादायक बातमी आहे. मुदतवाढीबाबत पी. एम. किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचे नोटीफिकेशन प्रसिध्द करण्यात आले आहे.

     पी. एम. किसान सन्मान निधी योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढ दिली गेली असली तरी शेतकऱ्यांनी उद्या करता येईल असे करत चालढकल न करता पुन्हा सर्व्हर डाऊनच्या समस्येपासून वाचण्यासाठी वेळेत हि ई-केवायसीची प्रक्रिया पुर्ण करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा या योजनेच्या लाभापासून आपण वंचित राहाल. 

यासाठी आवश्यक कादगदपत्रे

१) आधार कार्ड २) आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल     

         जे शेतकरी पी. एम. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात. त्या शेतकऱ्यांनी पी. एम. किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी करताना मोबाईल नंबर व आधार कार्ड दिले आहे. अशा शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. नसेल तर आधार नोंदणी केंद्र, पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमनकडे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याची सुविधा देण्यात आला आहे. त्यांच्याकडून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करुन घ्यावा.

          आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यास संबंधित शेतकऱ्यांनी सी. एस. सी. (कॉमन सर्व्हीस सेंटर) मध्ये जाऊन बायोमॅट्रीक सुविधेचा (अंगठ्याचा ठसा) वापर करुन आपली ई-केवाईसी करुन घ्यावी.

        केवळ ज्या शेतकरी पी. एम. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात अशाच शेतकऱ्यांनी हि ई-केवाईसी करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment