चंदगड/प्रतिनिधी
डुक्करवाडी(रामपूर) ता.चंदगड येथील गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांना नवचैतन्य सामाजिक विकास संस्था यांच्यावतीने डोंबिवली येथील भोईर सभागृहात चैतन्य भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमात विनोदी अभिनेता भूषण कडू, मास्टर समाजरत्न लोकशाहीर राजगुरू फिल्म सेन्सॉर बोर्डाचे .विलास खानोलकर .नित्यानंद वाळंज , ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र लंकेश्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय नवचैतन्य समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी संस्थापक अध्यक्ष संतोष गोपाळ सावंत यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल दखल घेऊन प्रामाणिकपणे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य करणारे गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांची निवड केली त्यांचे सामाजिक कार्य असल्याने त्यांची निवडीस पात्र आहेत व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजसेवक राजेंद्र कांबळे राजेंद्र जाधव,राजेंद्र सावंत श्रीपाल कांबळे, वनिता फाउंडेशन च्या अध्यक्षा वनिता कांबळे इत्यादींनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment