कालकुंद्री येथे १४ रोजी खुल्या भाषण स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2022

कालकुंद्री येथे १४ रोजी खुल्या भाषण स्पर्धा

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   कालकुंद्री ता. चंदगड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त खुल्या भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून स्पर्धेसाठी १) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर २) भारतीय संविधान ३) भगवान गौतम बुद्ध, हे तीन विषय देण्यात आले आहेत.
 इयत्ता पहिली ते सातवी लहान गट प्रवेश फी ३१ रुपये (वेळ ५ मिनिटे), विजेत्यांना अनुक्रमे  रोख बक्षिसे रुपये- १५००, १०००, ७००, ५००. मोठा गट आठवी ते बारावी (वेळ ५ मिनिटे) प्रवेश फी ५१ रुपये, विजेत्यांना अनुक्रमे रोख बक्षिसे रुपये- २०००, १५००, १०००, ५०० असून दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम १५ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता होणाऱ्या 'स्वरांगण म्युझिशियन २०२२' या संगीतमय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी होणार आहे. यावेळी सरपंच सौ छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच संगीत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा मंच कालकुंद्री यांच्या वतीने करण्यात आले आहे. भाषण स्पर्धा नाव नोंदणीसाठी 7057880280/ 7410093634/ 9922290205/ 9881956733 या नंबर वर संपर्क साधावा.







No comments:

Post a Comment