स्वराज्य महोत्सव अभियानांतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2022

स्वराज्य महोत्सव अभियानांतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वराज्य महोत्सव अभियानांतर्गत राष्ट्रगीत गायन झाले .सकाळी ठीक ११ वाजता सर्व विद्यार्थी व प्राध्यापक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील,  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. एस. एन. पाटील, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. एस. एम. पाटील यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.No comments:

Post a Comment