मनोहर भुजबळ भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सुरूते (ता. चंदगड) येथील रहिवसी व साडी येथील संत तुकाराम हायस्कुल चे अध्यापक मनोहर कृष्णा भुजबळ याना शामरंजन बहुद्देशीय फाउंडेशन, मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय संस्कृती संमेलनात समाजसेवक, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे व जेष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. नि:स्वार्थीपणे सामाजिक तथा सेवाभावी उलेखनीय कार्य करुन सामाजिक परिवर्तनाची प्रतिमा आपल्या कर्तुत्वाच्या वैशिष्ट्यपुर्ण गुणवतेच्या जोरावर आदर्श समाज सेवेची गौरवमुद्रा उमटवित आहात. याची दखल घेवुन मनोहर भुजबळ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री. भूजबळ यांना यापूर्वीही महाराष्ट्र प्रतिमा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment